ग्वाटेमाला: कोरोना वायरस (कोविड-19) महामारी शी लढण्यासाठी ग्वाटेमाला शुगर एसोसिएशन ने देशामध्ये मोबाइल हॉस्पिटल च्या निर्मितीसाठी 1 मिलियन डॉलर डोनेशन देण्याची घोषणा केली. या पैशाचा विनियोग ग्वाटेमाला शुगरकेन इंडस्ट्री च्या सेंटरमध्ये असणाऱ्या कोस्टा सूर यांच्या हॉस्पीटल साठी मेडिकल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी केला जाईल. याचे पहिले युनिट ग्वाटेमाला शहराच्या इंडस्ट्रियल झोन मध्ये निर्माण झाले आहे. याशिवाय एक्सेला, ओरिएंटे आणि पेटेन रीजन मध्ये तीन आणखी मोबाइल हॉस्पिटल सुरु करण्याची योजना आहे.
ग्वाटेमाला शुगर एसोसिएशन चे प्रेसिडेंट अल्फ्रेडो विला म्हणाले, ग्वाटेमाला च्या लोकांच्या हितासाठी या महामारीच्या परिस्थितीत त्यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ग्वाटेमाला चे प्रेसिडेंट एलेजांड्रो ग्लामेटेल यांनी डोनेशन चा चेक घेताना देशातील साखर उद्योगाचे या चांगल्या कामा बदल कौतुक केले.
ते म्हणाले, या महामारीच्या कठीण प्रसंगात या प्रकारचे अनुदान हे खरच उल्लेखनीय आहे. असोसिएशन बऱ्याच काळापासून देशहितासाठी काम करत आहे. इथे साखरेचे दरवर्षी 2.7 मिलियन मेट्रिक टन उत्पादन होते. आणि साखरेची निर्यातही केली जाते.
विला म्हणाले, आम्ही देशाच्या साखर उत्पादनात दर्जा सांभाळतो, तसेच ऊर्जा निर्मिती ही करतो ज्याचा वापर ग्वाटेमालाचे लोक करतात.
ग्वाटेमाला मध्ये 13 मार्च ला कोविड-19 ची पहिली केस समोर आली. एक 27 वर्षाचा तरुण जो स्पेन मधून आला होता, तो कोरोना बाधित होता. ग्वाटेमाला मध्येही कोरोना वायरस च्या प्रकरणात वाढ च होत चालली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.