हल्दौर : बिलाई साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्राच्या बजाज फाऊंडेशन आणि शेतकऱ्यांनी कमी खर्चात सेंद्रीय ऊस शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण दिले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या पद्धतीविषयी माहिती देण्यात आली. यावेळी वर्धा येथीळ कमल नयन जमनालाल बजाज फाउंडेशनमधून बिलाई साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आलेले संशोधक सचिन झाडे, प्रशांत शिरोडे, सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महाराष्ट्रातून आलेले शेतकरी सचिन चतुर यांनी सांगितले की, सध्याच्या काळात आपण रासायनिक शेतीवर भर देतो. मात्र, त्याचा खर्च दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दुसरीकडे त्याच्या वापराने शेत जमीन नापीक होत आहे. माणसाच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा. यासाठी बाजारातून कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्याची गरज नसल्याचे झाडे यांनी सांगितले. देशी गाईचे गोमुत्र व घरातील उपलब्ध वस्तूंमधून आपण जीवामृत, घनजीवामृत, बिजामृत, किटकनाशक तयार करू शकतो, असे ते म्हणाले. प्रशांत सिरोडे यांनी आंतरपिके घेण्याच्या मुद्यावर भर दिला.
यावेळी पथकाने शेतीची पाहणी केली. कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक जयवीर सिंह, ऊस विकास प्रमुख डी. प्रकाश, सहाय्यक महाव्यस्थापक सिताब सिंह, एचआर संजय गोयल, नवीन आर्य मनोज गिल, मनोज तोमर, नरेंद्र सिंह व कृषक धर्मेंद्र सिंह, शूरवीर सिंह, वीरपाल सिंह, प्रमोद, दिनेश, जितेंद्र, होशराम सिंह, विजयपाल सिंह, टीकम सिंह आदी उपस्थित होते.