ऊस पिकाचा किडीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन

हापूड : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ऊस पिकाचा किडीपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा कृषी अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना विभागात प्रमुख पिक असलेल्या उसावरील रोगांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कोणत्या किडीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे, याविषयी उपाय योजना सुचविण्यात आल्या. कीड रोखण्यासाठीचे तत्काळ उपाय काय आहेत, कोणत्या औषधांचा वापर करावा याविषयी माहिती दिली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, किडींविरोधात क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी, इमिडाक्लोरप्रिड १७.८ एलएस ३५० मिलीलिटर अशा प्रमाणात फवारणी करण्याची सूचना करण्यात आली. या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी ब्युवेरिया बेसियाना १.१५ प्रती बायोपेस्टीसाईड २.५ किग्रॅ प्रती हेक्टर ६० ते ७५ किलो शेणामध्ये मिसळून हलक्या पाण्यासोबत आठ ते दहा दिवस फवारावे अशी सूचना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here