धाराशिव : रांजणी येथील नॅचरल शुगर साखर कारखाना परिसरात राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहनिमित्त कर्मचाऱ्यांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षिततेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह ४ ते ११ मार्च या कालावधीत देशभर साजरा केला जातो. सप्ताहाच्या निमित्ताने रांजणी येथील नॅचरल शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखाना परिसरात सुरक्षिततेची जागृती व साधने वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेची सर्व साधने उपलब्ध असतात. मात्र ती वापरण्याकडे काही कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपघात होतात. घरातील कर्ता व्यक्ती जखमी झाला तर त्याच्या कुटूंबाला उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उरत नाहीत. घरातील इतरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. कुटूंबावर हालअपेष्टा सोसण्याची वेळ येते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या साधनांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी नॅचरल शुगरचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.