रुद्रपूर : अखिल भारतीय ऊस संशोधन योजनेंतर्गत आयोजित शेतकरी मेळावा तथा कृषी प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ संशोधकांनी शेतकऱ्यांना उसाच्या सेंद्रीय शेतीविषयी मार्गदर्शन केले. शुक्रवारी ऊस संशोधन केंद्रात आयोजित या मेळाव्यात विविध जिल्ह्यातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप शेतकरी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बल्कार सिंह होते.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावेळी कृषी संशोधकांनी शेतकऱ्यांना उसाच्या लागणीपासून ते तोडणीपर्यंत, चांगल्या प्रजातीचे बियाणे निवड, बिज उत्पादन, कीड व्यवस्थापन, खतांचा वापर याबाबत माहिती दिली. उसाचे उत्पादन कसे वाढवावे याबाबत माहिती देताना तज्ज्ञांनी सेंद्रीय उत्पादनावर भर दिला. यावेळी १० फर्म्सद्वारे स्टॉल लावण्यात आले होते. मल्टिप्लेक्स ग्रुपला जैविक उत्पादनांच्या श्रेणीत प्रथम क्रमांक देण्यात आला. वायर क्रॉप सायन्सला कीटकनाशक श्रेणीत आणि शेतकरी फर्टिलायझर एजन्सीला फार्म मशीनरीमध्ये प्रथम क्रमांक देण्यात आला. तीन दिवसीय प्रशिक्षणात चमोलीतील शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला. सीआरसीचे संयुक्त संचालक डॉ. एस. के. वर्मा, कनिष्ठ शोध अधिकारी, डॉ. आपी मौर्य, बीज उत्पादन केंद्र पंतनगरचे संयुक्त संचालक डॉ. आर. के. पंवार, डॉ. एस. एस. जीना, डॉ. संजय कुमार, सिद्धार्थ कश्यप आदी उपस्थित होते.