बागपत : दाहा गावात भैंसाना साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बैठक घेऊन लाल सड रोग प्रतिबंधक माहिती दिली. दाहा गावात भैंसाना साखर कारखान्याचे ऊस व्यवस्थापक योगेंद्र डबस यांनी शेतकऱ्यांना लाल सड रोगाचे नियंत्रण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. अलिकडील काळात ऊस पिकावर हा रोग मोठ्या प्रमाणात दिसून येत असून
त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे डबस यांनी सांगितले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हा रोग केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर साखर कारखानदारांसाठीही घातक आहे. लाल सड रोगाचा प्रादुर्भाव झालेला ऊस उपटून शेताबाहेर जाळून टाकावा असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला. शेतात ज्या ठिकाणी असा रोगट ऊस उपटून टाकला असेल त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर शिंपडून ती जागा मातीने झाकून टाकावी. अशा शेतात कमी पाणी द्यावे अशी सूचना करण्यात आली. मार्गदर्शन कार्यक्राला विकास राणा, जयपाल सिंग, सुनील कुमार, विकी, सतेंद्र, संजीव कुमार, पप्पन राणा आदी उपस्थित होते.