शामली : ऊस विकास विभाग, साखर कारखान्याच्या अधिकारी आणि कृषी संशोधकांच्या टीमने अनेक गावांचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना उसावरील कीड, रोग कसे ओळखावेत आणि त्यापासून पिक कसे वाचवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह यांनी सांगितले की, पथकामध्ये मुजफ्फरनगर ऊस संशोधन केंद्राचे अवधेश कुमार डागर, संशोधक अधिकारी नीलम कुरील, शामलीचे ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक प्रेमनारायण शुक्ला, दोआब साखर कारखान्याचे ऊस विभागाचे वरिष्ठ ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया, अतिरिक्त महाव्यवस्थापक के.पी. एस. सरोहा आदी सहभागी होते. विभागातील बलवा, सिंभालका, काबडौत, बुटराडी, कुडाना, आदमपूर, बनत, करौडी, भैंसवाल, गोहरनी, शेखपुरा, कंडेला आदी गावांचा पथकाने पाहणी दौरा केला. यावेळी त्यांना ऊस पिकावर टॉप बोरर किडीचा फैलाव अधिक झाल्याचे आढळून आले. त्याचे नियंत्रण कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. इतर किडींबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी राकेश शर्मा, नरेंद्र मलिक, कामिल, नेपाल सिंह, प्रेमपाल, आशीष आदी उपस्थित होते.