धामपूर : राज्याचे अप्पर ऊस आयुक्त तथा नोडल ऑफिसर डॉ. व्ही. बी. सिंह यांनी ऊस विभाग आणि साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या गाठी-भेटी घेवून शेताची पाहणी केली. ऊसाच्या चांगल्या उत्पादनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शेती करावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. जे शेतकरी शास्त्रिय पद्धत अवलंबत आहे, त्यांना चांगला फायदा होत असल्याचे डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जे शेतकरी पूरक पिके घेत ऊस शेती करतात, त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे असे अप्पर ऊस आयुक्त म्हणाले. त्यांनी नंगला आणि हैजरी या गावातील पाच वाणांच्या उसाची पाहणी केली. या शेतांमध्ये पट्टा पद्धतीने ऊसाची लागण करण्यात आली आहे. अप्पर ऊस आयुक्तांनी कारखान्याने तयार केलेल्या नर्सरीचा आढावा घेतला. धामपूर शुगर मिलकडून स्वयंसहाय्यता गटातील महिलांना वॉटर प्युरिफायर, आरओ, सॅनिटरी पॅड्स्, व्हेंडिंग मशीन, चष्मे, मास्क वितरीत करण्यात आले. यावेळी मुरादाबादचे उप ऊस आयुक्त अमर सिंह, जिल्हा ऊस अधिकारी, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एम. आर. खान, धामपूर साखर कारखान्याचे उप महाप्रबंधक ओमवीर सिंह आदी उपस्थित होते.