मुरादाबाद : त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड शुगर युनिट रानी नांगलचे उपाध्यक्ष व्ही. व्यंकटरमण यांच्या सूचनेनुसार साखर कारखान्याच्या ऊस विभागाचे अप्पर महाव्यवस्थापक टी. के. यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शेतकऱ्यांनी ऊसावरील रोगाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. पथकाने गढूवाला, प्रतापपूर, असदुल्लापूर पट्टी तथा जलालपूर आदी गावातील शेतकऱ्यांच्या गाठी-भेटी घेवून ऊस पिकाची पाहणी केली. कृषी संशोधक डॉ. बी. एल. शर्मा, सतीश बालियान आदींनी उसावरील किडींचे प्रकार. त्यांची लक्षणे, ती कशी ओळखावी आणि त्याला आळा कसा घालावा याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी जेवढा जागरुक होईल, तेवढा फायदा होईल असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे ऊस विभागाचे अप्प महाव्यवस्थापक टी. एस. यादव यांनी शेतकऱ्यांना एखाद्या किडीबाबतची माहिती कळाली नाही तर कारखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. ऊ, महाव्यवस्थापक सुनील बालियान यांनी सांगितले की, आगामी गळीत हंगाम २०२२-२३ ची तयारी गतीने सुरू आहे. उसाचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्याची माहिती शेतकऱ्यांना पडताळणीसाठी २० जुलै रोजी दिली जाईल असे आनंद सिंह यांनी सांगितले. हिंमांशू चौहान, विपिन कुमार, देवेंद्र सिंह, चंद्रपाल सिंह, रमणदीप सिंह, सुभाष सिंह आदी उपस्थित होते.