शरद ऋतूतील ऊस लागवडीच्या फायद्यांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

आझमगढ : सठियाव साखर कारखाना परिसरात शेतकऱ्यांसाठी शरद ऋतुमधील ऊस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने ऊस लागवड करण्याबाबत आणि त्याचे फायदे कोणते आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ऊस विभागाचे उपायुक्त उषा पाल यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. साखर कारखान्यासाठी ५६ लाख क्विंटल उसाची गरज आहे. मात्र केवळ २४ लाख क्विंटल उसाचा पुरवठा झाला आहे. ऊस शेतीचा विकास झाल्यास साखर कारखान्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही विकास होईल, असे त्यांनी सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरव्यवस्थापक अनिल चतुर्वेदी यांनी सांगितले की, ऊसाच्या वजनात कोणताही घोटाळा केला जाणार नाही. शेतकऱ्यांना ऊसाचे ७६ टक्के पैसे देण्यात आले आहेत. उर्वरित बिले दिवाळीपूर्वी दिली जातील. माजी उपसभापती पराग यादव यांनी शेतकऱ्यांचे पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. तर शेतकरी उमेश राय यांनी कारखान्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे शेतकरी ऊस शेतीपासून दुरावल्याचे सांगितले. माजी सरपंच लालचंद यादव यांनीही ऊस बिले वेळेवर मिळत नसल्याचा मुद्दा मांडला. शास्त्रज्ञ डॉ. ओम प्रकाश गुप्ता, डॉ. योगेंद्र भारती, डॉ. विनय कुमार मिश्रा आदींनी उसाच्या पूरक पिकांबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here