वैकुंठपूर: विभागातील आजवीनगर गावामध्ये आयोजित चर्चासत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रगत तंत्राने ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी उसाचा उत्पादन खर्च कमी करून जास्त नफा कसा मिळावावा, यासाठी काही पद्धतींविषयी शास्त्रज्ञांनी माहिती दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सिधवलीया साखर कारखान्याचे कार्यकारी उपाध्यक्ष आर. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञानाने ऊस लागवडीविषयी माहिती देण्यात आली. जास्तीत जास्त क्षेत्रात उसाची लागवड करण्याचे आवाहन या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले. कारखान्यातर्फे सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन उपाध्यक्ष सिंह यांनी शेतकऱ्यांना दिले.