सेंद्रीय खत निर्मितीबाबत शेतकऱ्यांना मेळाव्यात मार्गदर्शन

सीतापूर : सीतापूरमधील सेकसरिया साखर कारखान्याच्यावतीने खंबा पुरवा गावातील प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी हिमांशू नाथ सिंह यांच्या शेतावर शेतकरी मेळाला झाला. या मेळाव्यात ऊस सल्लागार आणि संशोधक आर. के. सिंह यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि किटकनाशकांपासून होणाऱ्या धोक्यांची माहिती दिली. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रीय खत निर्मिती कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संशोधक सिंह यांनी सांगितले की, आपण आजच्या काळात शेणखताची ताकद विसरून गेलो आहोत. पूर्वीच्या पिकांमध्ये शेणखताची ताकद अधिक असत होती. मात्र, आपण आताच्या काळात रासायनिक खतांचा अधिक वापर करतो. ते मानवी जीवनासाठी हानीकारक आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीवामृत तयार करण्याच्या पद्धतीची माहिती दिली. शेतकऱ्यांनी याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी कारखान्याच्या ऊस विभागाचे उप महाव्यवस्थापक अमरीश कुमार यांनी शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाच्या नव्या पद्धतींची माहिती दिली. ऊस विकास अधिकारी राज मिश्रा, नंदलाल, धर्मेंद्र कुमार, अंकुर यादव, पियूष त्रिवेदी, अशोक यादव, आयुष नाथ आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here