अहमदनगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड कामगारांसाठी कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, तालुका विधी सेवा समिती कोपरगाव आणि वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिरात कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश एस. बी. कोऱ्हाळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश कोऱ्हाळे यांनी ऊसतोडणी मजूर, वाहन चालक, मुकादम यांना मोटार वाहन कायद्यातील तरतूदीबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी वाहन चालकांनी ट्रॅक्टर, ट्रक ओव्हरलोडिंग न करण्याबाबत सूचना केल्या. वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. प्रत्येक वाहन चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. संदीप शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. शेतकी अधिकारी कैलास कापसे यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. एम. पी. येवले, जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. ए. एल. वहाडणे, ॲड. एस. एस. धोर्डे, ॲड. व्ही. जी. गवांदे, सेक्रेटरी बाबा सय्यद उपस्थित होते.