ऊस उत्पादनाच्या नव्या पद्धतींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नजीबाबाद : सहकारी ऊस विकास संस्थेच्या सचिवांनी पुरणपूर गढी या गावातील ऊस सर्वेक्षणाच्या कामाची अचानक पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना चांगले ऊस उत्पादन कसे घ्यावे हे शिकवले व ऊस पिकात नॅनो युरिया लिक्विडच्या वापराबाबत प्रबोधन केले.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंगळवारी सहकारी ऊस विकास संस्थेचे सचिव विजयकुमार शुक्ला यांनी पुरणपूर गढी गावात ऊस सर्वेक्षण कामाची अचानक पाहणी केली. सचिव विजय कुमार यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या सुधारित वाणांची माहिती दिली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी भारतीय बनावटीच्या नॅनो युरियाचा वापर करावा. नॅनो युरिया द्रवाची ५०० मिलीची बाटली एका युरियाच्या पिशवीइतकीच काम करते, ज्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते. पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी नॅनो युरिया लिक्विडच्या वापरास प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्वेक्षण पथकात ऊस पर्यवेक्षक विजेंद्र सिंग, लिपिक युद्धवीर सिंग, कृपाल सिंग, रघुनाथ सिंग, गोविंद सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here