अहमदाबाद: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये गुजरातमध्ये उसाचे उत्पादन १.०७ कोटी टनावरुन १.२१ कोटी टन म्हणजे १२ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील ऊस लागवड क्षेत्र वाढल्याने साखर उत्पादन वाढीच होत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गुजरातमधील ऊस क्षेत्र यंदा १.७४ लाख हेक्टरपर्यंत आहे. गेल्या वर्षी हेच क्षेत्र १.५० लाख हेक्टर होते. राज्यात ऊस उत्पादन वाढले असताना साखर उत्पादनात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. कारण यावर्षी साखरेचा उतारा घटला आहे.
गुजरातमध्ये सद्यस्थितीत १५ सहकारी साखर कारखाने सुरू आहेत. इंडियन शुगर मील असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार गुजरातमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत ५.५५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच काळात साखर उत्पादन ५.९५ लाख टन होते. प्रतिकूल मॉन्सून, खराब हवामानामुळे ऊसापासून साखरेचा उतारा कमी होत आहे. परिणामी साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीइतकेच होण्याची शक्यता आहे. मात्र यंदा साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. कारण यंदा गाळप हंगाम लवकर सुरू झाला आहे. मात्र उत्पादन गेल्या हंगामाएवढेच राहील असा अंदाज आहे.