गुलशन पॉलिओल्स लिमिटेडला इंधन वितरण कंपन्या (OMCs) – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आईओसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)यांना २,७१३ किलोलीटर इथेनॉल पुरवठ्यासाठी १८.८५ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
कंपनीने केलेल्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, गुलशन पॉलिओल्स लिमिटेडला बोरगाव येथील त्यांच्या ६० केएलपीडी इथेनॉल प्लांटमधून चौथ्या तिमाहीपर्यंत(ईएसवाय २३-२४)म्हणजेच ३१-१०-२०२४ पर्यंत पुरवठ्यासाठी २७१३ केएल इथेनॉलचे वाटप करण्यात आले आहे. याचे अंदाजे ऑर्डर मूल्य १८,८५,६६,००० आहे.गुलशन पॉलिओल्स लिमिटेडने अलीकडेच गोलपारा(आसाम) येथे त्यांच्या २५० केएलपीडी क्षमतेच्या धान्य आधारित इथेनॉल प्लांटमध्ये इथेनॉलचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले आहे.
कंपनी भारतातील इथेनॉल/जैवइंधन, धान्य आणि खनिज-आधारित विशेष उत्पादनांची आघाडीची उत्पादक आहे.त्यांचा व्यवसाय धान्य प्रक्रिया, जैव-इंधन/डिस्टिलरीज आणि खनिज प्रक्रिया ऑपरेशन्स अशा तीन मुख्य क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.