कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्सने कारखाना परिसरामध्ये रक्तदान शिबिरातून सामाजिक कार्य करत माणुसकीचे नाते जोडण्याचे काम गुरुदत्त परिवाराने केल्याचे गौरवोद्गार आ. डॉ. राहुल आवाडे यांनी केले. टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे शिवजयंती निमित्त गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. आवाडे बोलत होते. आ. आवाडे म्हणाले, कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांचे हित जोपासले आहे.
राहुल घाटगे म्हणाले, वर्षभरात पाच रक्तदान शिबिरांतून सहा हजार बॉटल संकलित केल्या आहेत. येथून पुढे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान-आरोग्य शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, करिअर व्यवस्थापन, व्यसनमुक्ती आदी विषयांवर प्रबोधन करून तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मानस घाटगे यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय भोजे, अरविंद माने, मुकुंद गावडे, उदय डांगे, संचालक शिवाजीराव माने देशमुख, बबन चौगुले, अण्णासाहेब पवार, शिवाजी सांगले, धोंडिराम नागणे, विठ्ठल ढवळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.