जॉर्जटाउन : या वर्षाच्या सुरुवातीला ऊस अनेक आठवडे पाण्यात बुडाल्याने गुयाना शुगर कॉर्पोरेशनच्या (GuySuCo) साखरेची गुणवत्ता घसरली आहे. पुरात जवळपास ३० टक्क्यांहून अधिक पिक नष्ट झाले असल्याने साखरेच्या गुणवत्तेबरोबरच सरासरी उताऱ्यामध्येही घट दिसून आली आहे.
उसाच्या खराब उत्पादनामुळे GuySuCoकडून चांगल्या, उच्च गुणवत्तेच्या साखरेचे उत्पादन होणे शक्य नाही. जवळपास ६५ दिवसांहून अधिक काळ ऊस पिक पाण्यात बुडून राहिल्याने पिकाचे उत्पादन घटले आहे. याशिवाय गुणवत्तेमध्येही घट झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.