ऊसावरील रोगामुळे ५० टक्के क्षेत्रातील पिकाची हानी

नरसिंहपूर : जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिक असलेल्या आणि सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या ऊस पिकावर कांडवा, बिल्टस पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव झाला आहे. कृषी अधिकाऱ्यांनीही याची खात्री केली आहे. जर वेळेवर रोगाचे नियंत्रण करण्यात आले नाही, तर पिकाचे प्रचंड नुकसान होऊ शकते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७० हजार हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. ऊस तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षात जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या कोएम २६१ प्रजातीवर रोगांचा फैलाव अधिक दिसून आला आहे. जवळपास ५० टक्के क्षेत्रात हेच पिक आहे. पाहणी दौऱ्यात या किड रोगाचा आढळ झाल्याची कबुली ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उसावर काही ठिकाणी कंडवा म्हणजेच स्पोरिसोरियम स्कीटेमीनिया रोगाचा फैलाव दिसला आहे. हवेद्वारे हा रोग पसरतो. याशिवाय बिल्ट आणि पांढऱ्या माशीचा फैलाव झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बिज उपचार आणि लसूण, कांदा, धने अशी आंतरपिके घेणे हा यावरील उपाय आहे. औषधांद्वारे याचे नियंत्रण करता येते. मात्र, त्याचा परिणाम दीर्घकालीन असत नाही. जिल्ह्यात या नगदी पिकाला खूप महत्त्व आहे. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत असल्याने बहुतांश शेतकरी उसाला प्राधान्य देतात. याबाबत नरसिंहपूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, कोएम २६१ या प्रजातीवर रोगांचा फैलाव दिसून आला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना उपाययोजनांची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here