बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्याची ८,५०० मेट्रिक टन क्षमता १५,००० मे. टन केली जाईल. याचबरोबर इथेनॉल उत्पादन व वीज निर्मितीमध्ये वाढ केल्यास येणाऱ्या काळात निश्चितच कारखाना नफ्यात येईल, असे प्रतिपादन माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगाम ऊस मोळी टाकण्याच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन एम. पी. पाटील होते.
चेअरमन एम. पी. पाटील म्हणाले, चार वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती त्यामध्ये आता मोठा बदल झाला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवल्याने आता जादा उसाचे गाळप होणार आहे. प्रत्येकाने कारखाना आपला समजून काम करावे. या गळीत हंगामात उद्दिष्ट पूर्ण करावे. दरम्यान, कार्यक्रमास कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संपादना स्वामी, महेशानंद स्वामी, शिवबसव स्वामी व प्राणलिंग स्वामींच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करून ऊस मोळी टाकण्यात आली. कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन पवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, सुकुमार पाटील, समित सासणे, जयकुमार खोत, प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, रमेश पाटील, रावसाहेब फराळे, शरद जंगटे, विनायक पाटील, गीता पाटील आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.