मनिला : कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर जगभरात हॅन्ड सॅनिटायजर ची मागणी वाढली आहे. भारतासह प्रत्येक देश सॅनिटायजरच्या उत्पादनात मग्न आहे. फिलीपीन्स मध्येही साखर कारखान्यांनी सॅनिटायजरचे उत्पादन सुरु केले आहे.
फिलीपीन्स चा प्रसिद्ध साखर कारखाना विक्टोरियस मिलिंग कॉर्प देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी सॅनिटायजर बनवण्यासाठी हातभार लावत आहे. वीएमसी चे अध्यक्ष विल्सन यंग म्हणाले की, आमचा कारखाना एक महिन्यात 200,000 लीटर रबिग अल्कोहोलचे( हॅन्ड सॅनिटायजर )उत्पादन करू शकेल . जे कोरोना वायरस महामारी वर अंकुश लावण्यावर मदत करणार्या सर्व रुग्णालयांना आणि विभिन्न संस्थांनाही डोनेट केले जाईल.
वीएमसी ने शुक्रवारी फिलीपीन स्टॉक एक्सचेंज ला सांगितले की, एथिल अल्कोहोल च्या निर्मितीसाठी आंतरिक महसूल विभाग आणि खाद्य आणि औषध प्रशासनाकडून तात्पुरता परवाना मिळाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.