न्यूयॉर्क : चीनी मंडी
गेल्या काही दिवसांतील निराशाजनक वातावरणानंतर वॉल स्ट्रीटवर आता चैतन्याचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यातील विक्रीनंतर बार्गेनिंग करणाऱ्यांनी बाजारात पुन्हा उडी घेतल्यानंतर बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची अपेक्षा होती. पण, सायबर स्पेंडिंगमुळे बाजारात शेअर्सचे भाव वधारले आहेत.
एस अँड पी ५०० आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रिज् यांच्या शेअर्सच्या किमतींमध्ये सरासरी १.५ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी नॅसडॅकचा शेअर दोन टक्क्यांनी वाढला. तिन्ही इंडेस्कवर गेल्या तीन आठवड्यातील सर्वांत मोठा फायदा पहायला मिळाला. एस अँड पी ५००चा शेअर त्यांच्या रेकॉर्डब्रेक उच्चांकी किमतीच्या १०.२ टक्क्यांवर बंद झाला. यावर्षी या शेअरच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा करेक्शन झाले आहे.
ऑनलाईन विक्रेत्यांनी खरेदीदारांना डिस्काऊंटची आणि मोफत शिपिंगची काही आमिष दाखवली होती. अॅडोब अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार सायबर मंडेमध्ये एकूण खरेदी ७.८ बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचली आहे. शिकागोमधील किंग्स् व्हूय अॅसेट मॅनेजमेंटचे पोर्टफोलियो मॅनेजर पॉल नोल्टे म्हणाले, ‘आज आम्ही जी बाजाराची स्थिती पाहत आहोत ती निश्चितच समाधानकारक आहे. वॉल स्ट्रिटवरचे हे मंडे शॉपिंग आहे.’
ई-कॉमर्समधील सर्वांत मोठी कंपनी Amazon.com (AMZN.O) च्या शेअर्समध्ये ५.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे नसडॅक आणि एस अँड पी यांसारख्या कंपन्यांनाही रिटेल इंडेक्सवर फायदा मिळाला. एसपीएक्सआरटी ३.१ टक्क्यांनी वर आला होता.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ‘एलसीओसी वन’ने पाच महिन्यांतील आपला सर्वांत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. कारण, पुरवठ्या संदर्भातील वाढती चिंता आणि स्टॉकपाइलर्सच्या कुरघोड्यांमुळे बाजाराती स्थिती बिकट झाली होती. ऊर्जा क्षेत्रातील त्यांच्या शेअसर्मध्ये मात्र आता १.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत मात्र घसरत चालली असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तेलाची किंमत जवळपास ३० टक्क्यांनी खाली आली आहे.
दरम्यान, जनरल मोटर्स आयएनसी (जीएमएन) यांनी उत्पादन कमी करण्याची घोषणा केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या दिवाळखोरीनंतर आता कंपनी पुन्हा उभी राहत आहे. पण, कंपनीने कमी विकल्या जाणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करण्याचे धोरण अवलंबले आहे. तसेच आपल्या मुख्यालयाच्या रिस्ट्रक्चरिंगची घोषणाही कंपनीने केली आहे. अर्थातच त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसत असून, शेअरची किंमत ४.८ टक्क्यांनी वाढली आहे.
ग्राहकांचा विचार केल्यामुळे एस अँड पी ५००च्या सर्व ११ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वाढ पहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सवाढीचा फायदा तंत्रज्ञान क्षेत्राला होताना दिसत आहे. आठ महिन्यांत अतिशय निराशानजक स्थितीत असलेल्या या क्षेत्राला, गेल्या आठवड्यात ६ टक्क्यांनी घसरण पहायला मिळला होती. पण, आता २.३ टक्क्यांची वाढ मिळाली आहे. एसएसएलआरसीडी आणि एसपीएलआरसीटी यांना सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे.