मापुटो [मोझांबिक]: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी मोझांबिकचे वित्त मंत्री अर्नेस्टो मॅक्स इलियास टोनेला यांच्यासोबत बैठक घेतली आणि ऊर्जा क्षेत्र विशेषतः गॅस, भारताच्या विकासाच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका कशी बजावेल यावर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मोझांबिकमधील ऊर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्यावर चर्चा केली. हरदीप सिंग पुरी आणि अर्नेस्टो मॅक्स इलियास टोनेला यांनी एलएनजी प्रकल्पाच्या वित्तपुरवठा यंत्रणेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली, असे मोझांबिकमधील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले.
मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले कि, आम्ही मोझांबिकमधील ऊर्जा प्रकल्पांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. चालू प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कौतुकही व्यक्त केले.हरदीपसिंग पुरी यांनी नमूद केले की, भारत आणि मोझांबिक यांच्यातील एकूण द्विपक्षीय व्यापारात हायड्रोकार्बन्सचे प्रमाण 35 टक्क्यांहून अधिक आहे. द्विपक्षीय व्यापारापैकी 35% पेक्षा जास्त हायड्रोकार्बन्सचा वाटा आहे. यावेळी सिंग पुरी यांनी मापुटो येथील हिरोज स्क्वेअर येथे मोझांबिकच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.
मंत्री पुरी यांनी मोझांबिकचे खनिज संसाधन आणि ऊर्जा मंत्री कार्लोस झकेरियास यांचीही भेट घेतली आणि मोझांबिकमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या USD 20 अब्ज LNG प्रकल्पाचे कामकाज लवकर सुरू करण्याबाबत चर्चा केली.दोन्ही नेत्यांनी भारत आणि मोझांबिकमधील द्विपक्षीय हायड्रोकार्बन व्यापार आणखी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. कार्लोस झकेरियास यांच्या भेटीदरम्यान, हरदीप सिंग पुरी यांनी मोझांबिकला नुकत्याच दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या ग्लोबल बायो फ्युल्स अलायन्सचा सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले.