नारसन : लिब्बरहेडी साखर कारखान्याकडून पुढच्या आठवड्यात सात दिवसाची थकबाकी दिली जाईल. कारखाना व्यवस्थापनाकडून या संदर्भात प्रयत्न सरु झाले आहेत.
जिल्ह्यामध्ये लक्सर साखर कारखान्याने 29 फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भागवली आहे. तर, लिब्बरहेडी तसेच इकबालपूर साखर कारखान्याने 22 फेब्रुवारीपर्यंतचीच शेतकर्यांची थकबाकी भागली आहे. इकबालपूर साखर कारखान्याने थकबाकी ऐवजी शेतकर्यांना साखर विकणे सुरु केले आहे. जवळपास 20 करोड रुपयांची साखर शेतकर्यांनी खरेदी केली आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्याच्या पैसे भागवण्याच्या विलंबाबाबत ऊसआयुक्त ललित मोहन रयाल नाराज झाले आहेत. तसेच ऊसाचे पैसे लवकरात लवकर देण्याबाबत त्यांनी आदेशही दिले आहेत. सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, या संदर्भात ऊस कारखान्यातील अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली आहे. कारखान्याकडून 20 फेब्रुवारी पर्यंतच्या थकबाकीची एडवाइज तयार करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत ऊस समितीमध्ये थकबाकीची रक्कम येण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.