उस शेतकर्‍यांच्या थकबाकी बाबात 9 सप्टेंबरला काशीपुरमध्ये धरणे आंदोलन करणार- हरीश रावत

काशीपूर: कोरोना काळात सरकारच्या धोरणांवर हल्ला करण्याची एकही संधी माजी मुख्यमंत्री हरीश रावत सोडू इच्छित नाहीत. फेसबुक च्या माध्यमातून ते म्हणाले की, शेतकर्‍यांची थकबाकी जर सरकारने भागवली नाही तर मी 9सप्टेंबरला काशीपुरमध्ये साखर आयुक्त कार्यालयावर धरणे ओदोलन करणार. काशीपुरमध्ये शेतकर्‍यांची ऊस थकबाकी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कारखाना बंद झाल्यानंतर पासून शेतकर्‍यांची लाखांची थकबाकी अडकली आहे.
उत्तराखंड मध्ये निवडणुकीची उलट मोजणी सुरु झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री तळागाळात जाऊन सातत्याने विविध क्षेत्रांचा दौरा करत आहेत, तर तंत्रज्ञानाचा फायदा घेवून रोज वेबीनारच्या माध्यमातून शेतकरी, युवा, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांसोबत वेबीनारही आयोजित करत आहेत. शनिवारी त्यांनी उधमसिंह नगर च्या विविध उस शेतकर्‍यांच्या समस्या ऐकल्या. वेबीनार नंतर त्यांनी आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून सांगितले की, कोरोनाची वेळ आहे. यासाठी मी किसन काँग्रेस च्या अध्यक्षांना प्रार्थना करतो आहे की, त्यांनी सितारगंज, बाजपूर आणि किच्छा मध्ये त्याच दिवशी 12 ते 4 वाजेपर्यंत साखर कारखान्यांवर धरणे आंदोलन करुन शेतकर्‍यांची 40 टक्के थकबाकीचा मुद्दा घ्यावा आणि मीदेखील काशीपुरमध्ये जसपूर च्या 25 -30 सहकार्‍यांबरोबर तसेच साखर आयुक्त यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करेन, त्यासोबत कोरोनाजन्य कर्तव्याचेही आम्ही पालन करु शकू आणि त्याचबराबेर शेतकर्‍यांप्रती आमचे जे दायित्व आहे, त्यालाही पूर्ण करु शकू. मला विश्‍वास आहे की, माझे सहकारी माझ्या भावना समजून घेवून पुढे पावले टाकतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here