कुरुक्षेत्र : शाहाबाद साखर कारखान्यामध्ये मॅन्युफॅक्चरींग केमिस्ट म्हणून काम करणारा कर्मचारी पहिल्या तपासणीत कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता, पण उपचारानंतर दोन तपासण्यांमध्ये तो निगेटिव्ह आढळला होता. त्या कर्मचार्याचा श्वसनाच्या आजराने रविवारी मृत्यू झाला.
कुरुक्षेत्र जिल्ह्याचे सिविल सर्जन डॉ. सुखबीर सिंह यांनी सांगितले की, या कारखान्यांतील कर्मचार्याने 30 एप्रिल ला चंदीगड च्या पीजीआईएमईआर मध्ये बर्याच काळापासून कोरोना वायरस पॉझिटीव्ह ची तपासणी केली होंती, आणि तो अस्थमाच्या आजाराने पिडीत होता. त्याच्यावर नियमितपणे उपचार सुरु होते. त्याला 30 एप्रिलला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. या कर्मचार्याच्या 13 आणि 14 मे ला केलेल्या दोन्ही कोरोना तपासण्या निगेटीव्ह आल्या होत्या. डॉ. सुखबीर म्हणाले, त्याचे अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्याला दुसर्या वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते आणि शनिवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. रविवारी संध्याकाळी शाहाबाद मध्ये स्वत:च्याच घरी जुन्या अस्थमाच्या आजाराने त्याचे निधन झाले. तो कोरोना निगेटीव्ह असल्याने त्याच्यावर सर्वसामान्यपणे अंतिम संस्कार करण्यात आले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.