कर्नाल : भारतीय किसान युनियनने (चारुनी) एसएपीमध्ये वाढीची मागणी करत २० जानेवारीपासून आपले विरोधी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांना एसएपीमधील वाढीच्या मागणीबाबत समाधानकारक प्रतिक्रिया दिलेली नाही असा दावा त्यांनी केला. एका व्हिडिओ संदेशात बिकेयूचे प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी सांगितले की, त्यांना राज्याचे कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीसोबत उसाच्या एसएपीमधील वाढीच्या मागणीबाबत चर्चा करण्यास बोलावण्यात आले. मात्र, त्यांना तीन सदस्यिय समितीला भेटण्यास सांगण्यात आले. चारुनी म्हणाले की, आम्ही ऊस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालत आहोत. आणि आता आम्ही २० जानेवारीपासून सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे गाळप बंद पाडून आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी सांगितले की, १० जानेवारी रोजी कर्नालमध्ये राज्यस्तरीय किसान महा पंचायतीमध्ये जिल्हा प्रशासनाने त्यांना आश्वासन दिले होते की, कृषी मंत्र्यांच्या समितीसोबत त्यांची बैठक १६ जानेवारी रोजी चंदीगढमध्ये आयोजित करण्यात येईल. मात्र, आता त्यांना ऊस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीसोबत बैठक घेण्यास सांगण्यात आले. आणि त्यांनी बहिष्कार घातला आहे. चारुनी म्हणाले की, शेतकरी मंगळवारी ऊस तोडणी बंद करतील आणि २० जानेवारी रोजी साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला जाणार नाही. बिकेयूचे सर्व सदस्य साखर कारखान्यांसमोर निदर्शने करतील आणि गळीत हंगाम बेमुदत काळासाठी बंद ठेवला जाईल.