हरियाणा: उसाच्या SAP वर २५ रुपये बोनस देण्याची बिकेयूची मागणी

पानीपत : राज्य समर्थन मुल्यामध्ये (SAP) वाढ करण्याची मागणी करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले आठवडाभराचे आंदोलन समाप्त केले आहे. साखर कारखान्यांना आपले गाळप पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

तर भारतीय किसान युनियनने (टिकैत) राज्य सरकारकडे उसावर प्रती क्विंटल ₹२५ बोनस देण्याची मागणी केली आहे. बिकेयूचे राज्य अध्यक्ष रतन मान यांनी पानीपतमध्ये शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना सांगितले की, सरकारने उसाच्या SAP मध्ये १० रुपये प्रती क्विंटल वाढ करून शेतकऱ्यांना धोका दिला आहे.

ते म्हमाले की, पिकांवर किडींच्या हल्ल्यामुळे उत्पादन खराब झाले आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्वरीत २५ रुपये प्रती क्विंटल बोनसची घोषणा केली पाहिजे. त्यांनी शेतकरी नेते गुरनाम सिंह चारुनी यांच्यावर सराकरकडून एसएपीमध्ये १० रुपयांची घोषणा केल्यानंतर आंदोलन समाप्त केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, बिकेयू (टिकैत) बोनससाठी आपले आंदोलन सुरूच ठेवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here