हरियाणा: ऊस दरवाढीसाठी बीकेयू करणार २५ डिसेंबरपासून आंदोलन

कर्नाल : उसाचे राज्य समर्थन मूल्यामध्ये (एसएपी) वाढ करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान यूनियन (बीकेयू-टिकैत) ने २५ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पानीपतमध्ये आयोजित एका राज्यस्तरीय किसान पंचायतीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. येथे उपस्थित शेतकरी नेत्यांनी सरकारला SAP प्रती क्विंटल ₹४५० करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली होती. सरकार त्यामध्ये अपयशी ठरल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर आंदोलने करण्यात येत आहेत.

हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानसार, बीकेयू (टिकेत) चे प्रदेशाध्यक्ष रतन मान यांनी सांगितले की, शेतकरी सर्व साखर कारखान्यांसमोर एकत्र येतील आणि एक तास कारखान्यांकडे जाणारे रस्ते अडवतील. ते म्हणाले, आमच्या आंदोलनामुळे लोकांच्या होणाऱ्या गैरसोयीला सरकारच जबाबदार असेल. सरकार शेतकऱ्यांना जाणून-बुजून त्रास देण्यासाठी ऊस दर जाहीर करण्यास उशीर करीत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. गेल्या महिनाभरापासून गाळप सुरू झाले असले तरी एकही रुपया मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पंचायतीवेळी भाकियूच्या नेत्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका समितीचीही स्थापना केली. शेतकऱ्यांनी सध्याच्या ३६२ रुपये प्रती क्विंटल एफआरपीऐवजी ४५० रुपयांची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here