हरियाणातील निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे आणि सर्व राजकीय पक्ष विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या निवडणुकीत साखर कारखाने आणि इथेनॉल उद्योगाला प्रगतीवर नेण्याचा मुद्दाही मांडण्यात येत आहे.
अलिकडेच भाजपाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरनाम्यात शेतकरी, साखर कारखाने आणि इथेनॉलशी संलग्न प्रगतीचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.
पक्षाच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनात म्हटले आहे की, आम्ही प्रत्येक सहकारी साखर कारखान्याशी संलग्न ११ इथेनॉल प्लांट बनवू. शहजादपूर साखर कारखान्याची पुनर्रचना केली जाईल. पक्षाने असेही म्हटले आहे की, आम्ही २४ पिकांची खरेदी किमान समर्थन मूल्यावर (MSP) सुरु ठेवू.
हरियाणातील सर्व ९० जागांवर एकाच टप्प्यात मतदान होईल. पूर्वी येथे एक ऑक्टोबर रोजी मतदान आणि चार ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, नंतर मतदानाची तारीख ५ ऑक्टोबर आणि मतमोजणीची तारीख ८ ऑक्टोबर करण्यात आली आहे.