कुरुक्षेत्र : भारतीय किसान युनियनच्या (चारुनी) बॅनरखाली शेतकऱ्यांनी हरियाणातील विविध साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात राज्य समर्थन मूल्य (एसएपी) वाढविण्याची मागणी करत आपल्या आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी सोमवारी कुरुक्षेत्रमध्ये एक बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी ऊसासाठी सध्या देणात येणाऱ्या ३६२ रुपये प्रती क्विंटल दराऐवजी ४५० रुपये प्रती क्विंटल दराची मागणी केली. शेतकऱ्यांनी २५ जानेवारी रोजी ठिकठिकाणी विरोधी निदर्शने करणे, २६ जानेवारी रोजी उसाची होळी करणे, २७ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणे आणि २९ जानेवारी रोजी गोहाना येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या रॅलीमध्ये भाजपविरोधी घोषणाबाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुरुक्षेत्रमधील सैनी धर्मशाळेत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बिकेयू चारुनीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुनाम चारुनी होते. बैठकीनंतर चारुनी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलन तीव्र करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. चारुनी यांनी सांगीतले की, २५ जानेवारी रोजी शेतकरी आपापल्या क्षेत्रात साखर कारखान्यांवर मोर्चा काढतील. तेथे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या प्रतिमेचे दहन केले जाईल. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनी शेतकरी नेते सर छोटू राम यांची जयंती आहे. त्यावेळी साखर कारखान्यांसमोर उसाची होळी केली जाईल. तसेच २७ जानेवारीपासून रोजी सर्व साखर कारखान्यांसमोर बेमुदत कालावधीसाठी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.