पलवल : राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील पलवल सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची ३४.१७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पलवलसह फरीदाबाद, नुंह, गुरुग्राम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे पैसे थकीत आहेत.
साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हंगामात साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून ३० जानेवारीअखेर ५३.१५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे. त्यापैकी १८.९७ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेश कुमार यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना ३५.७१ टक्के थकबाकी दिली आहे.
हरियाणासह उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही अद्याप ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत.