हरियाणा : ऑनलाइन साखर खरेदीच्या नावाखाली फसवणूक, सहा आरोपींना अटक

नारनौल : ऑनलाइन साखर खरेदी करण्याच्या आमिषाने ७५ हजार रुपयांच्या सायबर फसवणूकप्रकरणी मुख्य आरोपीसह सहाजणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आरोपींकडून ६७ डेबिट कार्ड, ९ सिम कार्ड, ५ चेक बुक, २ पासबुक, १० मोबाईल फोन आणि १०० व्हिजिटिंग कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथून संशयिताला अटक केली आहे. तक्रारदाराने साखर खरेदी करण्यासाठी जस्ट डायलवर विनंती केली होती. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराशी संपर्क साधला आणि साखर पाठवण्याच्या नावाखाली ७५ हजार रुपये ट्रान्सफर केले.

सुमित आणि हिमांशू (रा. अमृतपूर जि. फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश), मंगल सिंग (रा. डुबूरी, समसाबाद जि. फर्रुखाबाद), शिवा रा. नागला (रा. अमृतपूर जि. फर्रुखाबाद) अनूप (रा. उच्छाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी सुमितला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे आणि इतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तक्रारदाराने सायबर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो हरियाणाच्या पशुसंवर्धन विभागात काम करतो आणि त्याची पत्नी गावात भगवती एंटरप्रायझेसच्या नावाने पशुखाद्य बनवण्याचे काम करते. त्याच्या पत्नीने साखर खरेदी करण्यासाठी जस्ट डायलवर विनंती केली होती. नंतर त्यांना एका मोबाईलवरून फोन आला, फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने त्याच्या ट्रेडिंग कामाबद्दल सांगितले. त्याने साखरेचे नमुने व्हॉट्सअॅपवरही पाठवले. यासह, २ लाख रुपयांना १० टन साखर खरेदी करण्याचा करार झाला. प्रथम त्याने काही टक्के रक्कम मागितली, ज्यावर तक्रारदाराने ७५,००० रुपये पाठवले. त्यानंतर संशयितांनी आणखी ५०,००० रुपयांची मागणी केली. ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने तक्रार दाखल केली. सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाला या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी त्यांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here