चंदीगढ : हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल म्हणाले, आगामी गाळप हंगामामध्ये सहकारी साखर कारखान्यांचे नुकसान दूर करण्यासाठी पलवल आणि कैथल सहकारी साखर कारखान्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर गुळाचे उत्पादन सुरु केले जाईल. ते म्हणाले, या दोन्ही साखर कारखान्यांमध्ये या प्रायोगिक प्रोजेक्टच्या यशानंतर, राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांमध्येही गुळ उत्पादन सुरु केले जाईल. मंत्र्यांनी गुरुवारी शाहाबाद मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या अधिकार्यांसह विडियो कॉन्फरसिंग च्या माध्यमातून आयोजित बैठक़ीच्या अध्यक्ष स्थानावरुन ही माहिती दिली.
हरियाणा शुगरफेड च्या अधिकार्यांनी पंजाब च्या बुधवाल को ऑप साखर कारखान्याचाही दौरा केला. जो गुळ आणि साखरे च्या फतेह ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे. ते म्हणाले, चांगल्या दर्जाचा गुळ जवळपास 70-80 रुपये प्रति किलो मध्ये विकला जात आहे. आम्ही आपल्या राज्यातील लोकांसाठी चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करु शकू.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.