कर्नाल : विभागीय ऊस संशोधन संस्थेत एक दिवसीय कार्यशाळेत प्रगत बियाणे आणि लाभदायी ऊस शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच बिहार राज्यातील ३० साखर कारखान्यांचे अधिकारी, प्रगतशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. विभागीय ऊस संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. एम. एल. छाबडा, कोईंबतूर ऊस संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री डॉ. राम बक्शी, विद्यमान संचालक डॉ. जी. हेमा प्रभा यांची प्रमुख उपस्थिती होती.
दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, देशाच्या एकूण ऊस लागवड क्षेत्रफळाच्या ७५.८ टक्के भागात ऊस संशोधन संस्थांमार्फत विकसित केलेल्या ऊस प्रजातींची लागवड केली जाते. २२ टक्के क्षेत्रात राज्य कृषी विद्यापीठे आणि इतर संबंधित संस्थांनी विकसित केलेले वाण आहेत. ऊस संवर्धन संस्थेच्या सहकार्याने ऊस संशोधनासाठी लागवड केली जाते. ऊस संशोधन संस्थेतील संशोधकांचे डॉ. जी. हेमप्रभा, डॉ. राम. बक्शी यांनी अभिनंदन देले.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रविंद्र कुमार यांनीही मार्गदर्शन केले. ‘साखर उत्पादन वाढ’ विषयावर डॉ. बक्शी राम यांनी मार्गदर्शन केले. टिश्यू कल्चरद्वारे उत्पादित रोपांचा वापर करून अधिकाधिक ऊस उत्पादन करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. संशोधक डॉ. एस. के. पांडे, डॉ. एम. आर. मीना, डॉ. पूजा, आणि साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.