अंबाला : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नारायणगढ शुगर मिल प्रा. लिमिटेडकडे जवळपास १०० कोटी रुपयांची ऊस बिलांची थकबाकी देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले. यासोबतच शेतकऱ्यांना कारखान्याच्या बिल देण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. आंदोलन सुरू केलेल्या पाच शेतकऱ्यांमध्ये भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) शहीद भगत सिंह (एसबीएस) चे उपाध्यक्ष विक्रम राणा, संयुक्त ऊस शेतकरी समितीचे गुरविंदर सिंह जाटवाड़, एसकेएम इंकलाब मंच चे धर्मवीर ढिंडसा, युवा शेतकरी रजत सिंह आणि गुरतेज राछेरी यांचा समावेश आहे. जर प्रशासनाने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर कठोर निर्णय घेतला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
ते म्हणाले, नारायणगढ साखर कारखान्याकडे १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. प्रशासन, सरकार १४ दिवसांत ऊस बिले दिली जातील असा नियम सांगते. मात्र, पैसे देण्यात अपयशी ठरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. धर्मवीर ढिंडसा म्हणाले की, हरियाणा सरकार शेतकऱ्यांना हळूहळू संपवत चालली आहे. कारखाने फायद्यात आहेत. मात्र, शेतकऱ्यांना जाणुनबुजून पैसे दिले जात नाहीत. नारायणगञ कारखान्याकडे असलेल्या इतर प्रश्नांची सोडवणूक करू घेण्याची वेळ आली आहे.
विक्रम राणा म्हणाले की, प्रशासनाने शेतकऱ्यांना त्वरीत बिले दिली पाहिजेत. बिकेयू एसबीएसचे प्रवक्ते तेजविर सिंह म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून काहीच फायदा झाला नाही, शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले. शेतकऱ्यांनी नारायणगढचे उपजिल्हाधिकारी सी. जयशारदा यांच्यासोबत बैठक घेतली. याबाबत निवेदन दिले जाणार असून आयुक्तांकडे मागण्या मांडल्या जातील असे सांगण्यात आले.