कर्नाल : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मेरठ रस्त्यावर उभारण्यात आलेला कर्नाल सहकारी साखर कारखाना रविवारपासून सुरू झाला आहे. या कारखान्याचा फायदा परिसरातील सुमारे १३० गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.
नव्या साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन २२०० मेट्रिक टनावरून ३५०० मेट्रिक टन करण्यात आली आहे. या गाळप क्षमतेचा विस्तार ५००० मेट्रिक टन प्रतीदिन करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. याशिवाय सहवीज प्रकल्पातून कारखाना साधारणतः १८ मेगावॅट वीजही उत्पन्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.