अंबाला : ऊस थकबाकी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू

अंबाला : चालू गळीत हंगामातील ६० कोटी रुपये रुपयांच्या थकबाकीच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नारायणगड विभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.

याबाबत हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, धरणे आंदोलनाचे नेतृत्व २१ सदस्यिय समिती करत आहे. यामध्ये नव्याने स्थापन झालेला भारतीय किसान संघाशी (शहीद भगत सिंह) जोडले गेलेले शेतकरी सहभागी आहेत. तर बिकेयू (चारुनी), बिकेयू (टिकैत), बिकेयू (भाईचारा) आणि गन्ना संघर्ष समितीसारख्या कृषी संघटनांनी आंदोलनात भाग घेतलेला नाही.

पहिल्या दिवशी प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली नाही. बीकेयूचे (एसबीएस) प्रदेशाध्यक्ष अमरजित सिंह मोहरी यांनी सांगितले की, जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. गेल्या तीन महिन्यात काहीच पैसे मिळालेले नाहीत. पावसाने गहू, बटाटे, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here