कर्नाल : गेल्या हंगामात टॉप बोरर किडीमुळे मोठे नुकसान सोसावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा विभागात किडींचे प्रजनन दिसून आल्याची सूचना मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ऊस संशोधन संस्था, विभागीय केंद्र कर्नालच्या संशोधकांना शेतांमध्ये किडीची अंडी, पतंग आढळले आहेत. गेल्या हंगामात किडींमुळे उत्पादनाला फटका बसला होता.
याबाबत ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार ऊस संशोधन संस्था, कर्नालचे विभाग प्रमुख डॉ. एस.के. पांडे यांनी सांगितले की, सध्याच्या वातावरणात किड आढळणे अतिशय धोकादायक आहे. आम्ही पूर्ण विभागाचा सर्व्हे केला आहे. शेतामध्ये अंडी आणि पतंग आढळले आहेत. हा प्रजनन काळ आहे. तो राखला तरच पिके वाचवता येतील.
किडींच्या हल्ल्याबाबत सांगताना ते म्हणाले, किडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पिकाच्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम होतो. नंतर बंची टॉप या प्रकारात ही किड येते. किडीचा तिसरा व चौथा टप्पा खूप नुकसान करतो. कीड फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळात सक्रीय असते. यादरम्यान शेतकऱ्यांनी सावध राहावे आणि किड रोखण्यासाठीची उपाययोजना करावी.