चंदीगड : हरियाणा सरकारने राज्यातील विविध सहकारी साखर कारखाने आणि सहकारी समित्यांवरील पदांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा पदांवर फेर नेमणूका केल्या जाणार आहेत. भूना सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे आणि जे कर्मचारी कोणत्याही पदासाठी पात्र नाहीत, अशा १५९ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
याशिवाय, या जेव्हा संबंधित साखर कारखान्यांमध्ये कामाची गरज असेल, अशा वेळी या कर्मचाऱ्यांना बोलावले जाणार आहे. उर्वरीत १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. सहकारी साखर कारखाने आणि सहकार समित्यांवर २३७ कर्मचाऱ्यांना याआधीच त्यांच्या पात्रतेनुसार पदांचे पुनरुज्जीवन करून नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.