हरियाणा: नोव्हेंबर मध्ये सुरु होणार ऊस गाळप

चंदीगढ: हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले की, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडयापासून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू होईल आणि कारखान्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे, जेणेकरुन शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागू नये. बुधवारी पंचकूला मध्ये HAFED कार्यालयात सहकारी साखर कारखान्यांचे प्रबंध निदेशकांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन बोलताना, मंत्री लाल यांनी सांगितले की, कारखान्यांकडून ऊसाचे पैसे ऊस उचलतानाच देण्याबाबत पावले उचलली गेली पाहिजेत.

याशिवाय, त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ऊस गाळपाच्या वेळी कोणतीही समस्या येऊ नये आणि पूर्ण हंगामा दरम्यान काम चांगल्या पद्धतीने व्हावे. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यानी सर्व आवश्यकता पूर्ण कराव्यात, जेणेकरुन हंगामा दरम्यान गाळपामध्ये बाधा येऊ नये. मंत्र्यांनी सर्व प्रबंध निदेशकांना निर्देश दिले की, त्यांनी साखर कारखान्यांना नुकसानीतून वाचवण्याचा प्रयत्न करावा. साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आणण्यात आलेल्या ऊस पीकाला वेळेवर ट्रॉलीतून उतरवल्या जाव्यात आणि ऊसाचे पैसे वेळेवर मिळावेत. त्यांनी हे देखील सांगितले की, ज्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे देय बाकी आहे, ते लवकरात लवकर भागवावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here