हरियाणा : कमी विज पुरवठ्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत

चंदीगढ : उन्हाळ्यामुळे हरियाणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या पिकाला वाचविण्यासाठी सतत प्रयत्न करावे लादत आहेत. कारण फिडरला पाच तास विज पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी अवघ्या पाच तासांचा वीज पुरवठा अपुरा असल्याचे म्हटले आहे. कारण येथील शेती टिकविण्यासाठी ते विंधनविहिरींवर अवलंबून आहेत. ऊस आणि भाजापीला उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राचा वीज पुरवठा तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे. कृषी फिडरचा वीज पुरवठा आठ तासांवरून पाच तासांपर्यंत कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सद्यस्थितीत तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. बहुतांश पिके, खास करून ऊसाला दर आठवड्याला सिंचनाची गरज भासते.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाच तास विजेचा पुरवठा एक एकराच्या सिंचनासाठी पुरेसा नाही. शेतकऱ्यांनी कृषी फिडरना किमान १० तासांपर्यंत वीज पुरवठा वाढविण्याची मागणी केली आहे. विंधनविहिरींच्या सिंचनाने पिकांचे रक्षण करणे हा एकमेव उपाय आहे आणि खराब वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे.

उत्तर हरियाणा वीज वितरण महामंडळाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृषी फिडरना पाच तास वीज पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. मात्र, हे निर्देश जारी झाल्यानंतर फिडरना जादा पुरवठाही केला जातो. शेतकरी नेते कौशिक यांनी सांगितले की, त्यांना वीज विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पि. के. दास यांना पत्र लिहून यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. कारण ऊस आणि भाजीपाल्याचे पिक सात लाख एकर जमिनीत घेतले जाते. जर पुढील दोन दिवसांत वीज पुरवठ्यात सुधारणा करण्यात आली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here