पानीपत : हरियाणातील पानीपतच्या डाहर गावातील साखर कारखाना राज्यातील ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठीएक संधी देत आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या उसाचे गाळप झाले नसेल तर तो आपला ऊस कारखान्यात आणू शकतो. या साखर कारखान्याने आतापर्यंत सोनीपत, गोहाना आणि रोहतकमधील शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल ऊस गाळप केला आहे. पानीपतमधील शेतकऱ्यांचा ऊस गाळप करून दोन आठवडे उलटले आहेत. आता इतर जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस घेवून साखर कारखान्यात येत आहेत. व्यवस्थापनाने कारखाना पुन्हा एकदा चालविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुरेसा ऊस मिळाल्यानंतर कारखाना पुन्हा सुरू केला जावू शकतो. जर आता ऊस लवकर संपला तर पुन्हा कारखाना सुरू केला जाणार नाही. पानीपत कारखान्याची गाळप क्षमता ५० हजार प्रती क्विंटल आहे. एका महिन्यात कारखाना १५ लाख क्विंटल ऊस गाळप करू शकतो. या कारखान्याने राज्यात सर्वाधिक ऊस गाळप केला आहे. कारखान्याचे एमडी नवदीप सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याने जिल्ह्यात जवळपास ६२ लाख क्विंटल ऊसाचे गाळप पाच एप्रिलपर्यंत पूर्ण केले आहे. आता इतर जिल्ह्यातील ऊस गाळप सुरू आहे. सोनीपत, गोहाना आणि रोहतकच्या शेतकऱ्यांचा तीन लाख क्विंटल उसाचे गाळप केले जात गेले आहे. आता इतर ठिकाणचा ऊसही स्वीकारला जात आहे.