सोनीपत : सोनीपत विभागात अद्याप २२०० एकर क्षेत्रात ऊस पिक गाळपाविना आहे. त्यामुळे गोहाना साखर कारखान्याच्या प्रशासनाने उभ्या उसाचा सर्व्हे करून शिल्लक उसाचा अहवाल तयार केला आहे. अधिकाऱ्यांना या उसाचे आगामी २० दिवसांत गाळप पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. कारखाना प्रशासानाने हंगामात ४८ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. विभागात जवळपास २१,५०० एकरात ऊस पिक लागवड करण्यात आले आहे. साखर कारखाना प्रशासनाने उसाचे सरासरी उत्पादन गृहित धरु ४८ लाख क्विंटल गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गोहाना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आशिष वशिष्ठ यांनी सांगतिले की, गळीत हंगामादरम्यान, आतापर्यंत ३२ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. उर्वरीत उसाचे गाळप करून टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण क्षमतेने कारखाना चालविण्याची सूचना केली आहे. अधिकाऱ्यांकडून शेतांमध्ये शिल्लक उसाचा सर्व्हे करण्यात आला आहे.