हरियाणा : शेतकऱ्यांना ऊस बियाणे नर्सरीसाठी राज्य सरकार देणार अनुदान

जींद : कृषी तथा शेतकरी कल्याण विभागाकडून हंगाम २०२४-२५ मध्ये ऊसाची नर्सरी चालविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती एकर ५,००० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जींद जिल्ह्याचे सहाय्यक ऊस विकास अधिकारी डॉ. यशपाल सिंह यांनी ही माहिती दिली. ऊस लागवसाठी प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यास इच्छुक शेतकरी ३१ डिसेंबरपर्यंत हरियाणा कृषी आणि कल्याण विभागाच्या www. agriharyana.gov.in या वेबसाइटवर आपले अर्ज सादर करू शकतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला मेरी फसल मेरा ब्योरा पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

सहाय्यक ऊस विकास अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमित पद्धतीने ऊसाचे बियाणे निर्मिती केल्यास ३००० रुपये प्रती एकर तर एकडोळा पद्धतीने ऊस बियाणे तयार केल्यास ३,००० रुपये मदत दिली जाईल. ऊसाची प्रगत जात सीओ १५०२३ याच्या लागवडीसाठी प्रती एकर ५,००० रुपये अनुदान सहाय्य रक्कम दिली जाईल. याशिवाय सीओ १५०२३ प्रजातीचा ऊस इतर शेतकऱ्यांना बियाण्यांच्या स्वरूपात विकल्यास संबंधित शेतकऱ्याला प्रती एकर ५ हजार रुपये अनुदान दिले जाईल. शेतकरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन एकरांपर्यंत घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here