हरियाणा : ऊस बिलांसाठी १४ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा

अंबाला : नारायणगड साखर कारखान्याकडून गळीत हंगाम २०२१-२२ मधील सुमारे ७१ कोटी रुपये प्रलंबित आहेत. ही थकबाकी मिळावी यासाठी अंबाला येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. भारतीय किसान युनियन, बीकेयू चारुनी गट, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि बिकेयू शहीद भगत सिंह यांच्याशी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर आपली थकबाकी देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.

टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नारायणगड साखर कारखान्याच्या नारायणगड उपविभागीय अधिकारी (एसडीएम) सह मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज हे आंदोलनस्थळी पोहोचले. गेल्या हंगामात २०२०-२१ मध्ये चांगला व्यवसाय झाला नसल्याने उत्पादित साखरेची विक्री जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बिले मिळणे कठीण आहे असे त्यांनी सांगितले. बिकेयू चारुनीचे अंबाला जिल्हाध्यक्ष मल्कियत सिंह साहिबपुरा यांनी सांगितले की, २०२१-२२ मध्ये २३ नोव्हेंबरला कारखान्याने गाळप सुरू केले आहे. गेल्या दोन महिन्यातील ७१ कोटी रुपये थकीत आहेत. आम्ही प्रशासनाला १३ फेब्रुवारीची मुदत दिली आहे. अन्यथा त्यानंतर आम्ही धरणे आंदोलन सुरू करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here