करनाल: महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर राज्यांनंतर आता हरियाणा येथे पिके पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील यमुनानगर, करनाल, पानीपत आणि सोनीपत जिल्ह्यात हातनीकुंड बंधार्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर आला आहे. गेल्या दोन दिवसात पाऊस कमी झाला असला तरीही शेतजमिनीत पाणी साचून राहिले आहे.
पुरामुळे इतर पिकांप्रमाणेच ऊसालाही मोठा फटका बसला आहे, यामुळे ऊस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यमुनानगर जिल्ह्यातील डझनभर खेडीही हथनिकुंड बंधार्यातून सोडण्यात येणार्या पाण्याने जलमय झाली.
मुख्य सचिव केशनी आनंद अरोरा म्हणाले, मुसळधार पावसामुळे यमुनेची पाण्याची पातळी यावेळी वाढून 8.28 लाख क्युसेकपर्यंत गेली आहे. 2013 मध्ये ती 8.14 लाख क्युसेक होती.
ऊस क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यात साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासणीनुसार बेळगाव जिल्ह्यात 40 लाख टन ऊसाचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पूर आल्याने ऊसाचे नुकसान झाले आहे. संपूर्ण भारतभर झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत. अहवालानुसार, अतिवृष्टी आणि पुरामुळे 1058 जणांचा बळी गेला आहे. गेल्या वर्षी एकूण मृत्यूचे प्रमाण 1211 होते. यंदा त्यात वाढ झाली आहे.
पुरामुळे केवळ जिवित हानी झाली नाही तर हजारो कोटींच्या मालमत्ता, पिके आणि इतरांचे नुकसान झाले आहे. उद्योग संस्था आणि राजकीय पक्षांनीही परिस्थितीचे परीक्षण केले. त्यानुसार, केवळ महाराष्ट्रात उद्योग बंद पडल्यानंतर कमीतकमी 10000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.