धाराशिव : कळंब तालुक्यातील जवळा (खुर्द) येथील हातलाई शुगर प्रायव्हेट लिमिटेड या गूळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम व मोळी पूजन सोहळा शिवजयंतीदिनी पार पडला. यावेळी युगांडाच्या सहकारमंत्री नतबा हॅरियट, कोलंबियाचे व्यापार सल्लागार जी. मोहनराव, अजिंठा फार्मा लिमिटेड सल्लागार मधुसूदन अग्रवाल व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, हातलाई शुगरचे चेअरमन अभिराम पाटील उपस्थित होते.
नाबा हॅरियट म्हणाल्या की, हातलाई शुगर्समुळे परिसरातील बेरोजगारी कमी होईल. आमच्या देशाबरोबर झालेल्या निर्यात करारामुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. हातलाई शुगरच्या माध्यमातून या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होईल. सुधीर पाटील यांनी प्रास्ताविकात युगांडासोबत निर्यात करारातून या क्षेत्राला होणाऱ्या फायद्याची माहिती दिली.
यावेळी तुळजाभवानी बँकेचे चेअरमन संजय पाटील, रुपामाता उदयोगाचे प्रमुख व्यंकटराव गुंड, राजेंद्र नहाणे, महेश आव्हाड, दत्ता कुलकर्णी, अनिल काळे, हणुमंत मडके, अमरसिंह देशमुख, दिगंबर मळेकर, अनिल कांदे, राहुल पाटील, पीयूष मळेकर, किशोर सावंत, शीतल शिंगाडे, संजय दुधगावकर, रवी दुधगावकर, किशोर सावंत, प्रेमाताई पाटील, आदित्य पाटील, डॉ. मंजुळाताई पाटील, गुणवंत पवार, विजय देशमुख, रामभाऊ बांगर आदी उपस्थित होते. चेअरमन अभिराम पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.