मुंबई : दरवर्षी आयटीआर (Income Tax Return) भरण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ दिली जाते, पण यंदा आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयटीआर (Income Tax Return) भरण्यासाठी अंतिम तारीख वाढवण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचे समजते.
आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. तसेच यंदाचे ITR भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. ३१ डिसेंबर ही तारीख त्यांच्यासाठी आहे, जे करदाते विलंब शुल्कासह विलंबित ITR दाखल करणार आहेत. मात्र, ३१ जुलैपर्यंत आयटीआर भरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. त्यामुळे पात्र करदात्यांनी ३१ जुलै रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे विवरणपत्र भरावे, अशी शिफारस करण्यात आली आहे.१७ जुलैपर्यंत २.८ कोटींपेक्षा जास्त ITR दाखल झाले आहेत. ई-फायलिंग वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, १७ जुलैपर्यंत २.८८ कोटी प्राप्तिकर रिटर्न भरले गेले. ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर भरण्यामुळे करदात्यांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यास मदत होतेच, तसेच रिफंडच्या जलद प्रक्रियेतही मदत होते.