नवी दिल्ली : देशातील आघाडीची आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने यंदा १० अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ७२,८०० कोटी ) उत्पन्न मिळवले असून आता यातील काही लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना ७०० कोटी रुपये विशेष बोनस म्हणून जाहीर केला आहे.
एचसीएल टेक्नॉलॉजीने म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांना हा विशेष बोनस दिला जाईल. कंपनीकडून गेल्या महिन्यात सांगण्यात आलेल्या आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये याचे व्याज आणि करपूर्व उत्पन्न सहभागी केले जाणार नाही.
एचसीएल टेक्नॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी २०२० मध्ये १० अब्ज अमेरिकन डॉलरच्या उत्पन्नासह जगातील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ७०० कोटींचा खास बोनस जाहीर केला आहे. कंपनीच्या एक वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दहा दिवसांचे वेतन बोनस म्हणून मिळेल. एचसीएल टेक्नॉलॉजीचे मुख्य मानव संसाधन अधिकारी व्ही. व्ही. आप्पाराव यांनी सांगितले की, कोरोना महामारी असतानाही एचसीएल परिवारातील प्रत्येक सदस्याने एकजूट दाखवून संस्थेच्या विकासात योगदान दिले आहे